Supply Inspector Recruitment 2023 | पुरवठा निरीक्षक भरती 2023
अन्न पुरवठा निरीक्षक भरती २०२३
अन्न पुरवठा निरीक्षक २०२३ हि जाहिरात लवकरच येत आहे . हि परीक्षा कोण घेणार आहे? शैक्षणिक अहर्ता काय आहे? हे जाणून घेऊया
यात महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग द्वारे पुरवठा शाखेतील पुरवठा निरक्षकांची आणि वित्तीय सल्लागार व उपसचिव यांच्या कार्यालयातील उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी IBPS कंपनीची निवड करणेबाबत तसेच समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्याबाबत सदर सूचना महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग द्वारे दिल्या गेले आहेत .
शासन निर्णय दि. वितविभाग ३१/१०/२०२२ अन्वये पद्भारतीतील काही निर्बंधामुळे काही शिथिलता देऊन त्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला आहे अश्या विभागातील सरळसेवेच्या कोठ्यातील रिक्त पदे १०० टक्के भररविण्यास च्या अनुषंगाने उच्च स्तर सचिव समितीच्या मान्यतेने या विभागाच्या शासननिर्णयाप्रमाणे दिनांक १८/०४/२०२२ अन्वेय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयीन पदाचा आढाव्यानंती सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे .
आणि सामान्य प्रशासन विभागाच्या २१/११/२०२२ च्या शासननिर्णय नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवाआयोगाच्या कक्षाबाहेर गट – ब अराजपत्रीत गट – क व गट -ड संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरतांना यापुढे स्पर्धा परीक्षा टी सी एस आय ओ एन व आय बी पी एस या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यास मान्यता देण्यात आली आहे . त्यानुसार पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकाची आणि वित्तीय सल्लागार व उपसचिव यांच्या कार्यालयाचा अधिपत्याखालील उच्चस्तर लिपिकाची सरळसेवेची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया आय . बी. पी एस. कंपनीमार्फत राबविण्याची तसेच भरती प्रक्रिया रबसविण्याकरिता समन्वय अधिकारी त्यांची नेमणूक कारणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यामुळे प्रश्नावनेत नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ४/०५/२०२२ रोजी च्या शासन निर्णयानुसार अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखाली पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकाची आणि वित्तीय सल्लागार व उप सचिव यांच्या कार्यालयातील उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार असून , सादर भारी प्रक्रिया राबविण्यासाठी आय . बी. पी एस. कंपनीची निवड करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे . विभागीय आयुक्त यांच्या अधिनस्त पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक हे पद विभागीय संवर्ग GROUP C पद आहे. पदभरतीमध्ये एकसूत्रता राहणे आवश्यक असल्याने सदर पदाची भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीन ने सुरु करण्यात येणार आहे.
तसेच पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिकाची सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी समन्वय व अनुषंगिक आवश्यक कार्यवाही करण्यासाठी खालील समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात येत आहे .
भरती प्रक्रियेत राबविण्यात येणाऱ्या पदाचे नाव – १) पुरवठा निरीक्षक
सामन्धीत अधिकारी – उप आयुक्त पुरवठा , कोकण विभाग नवी मुंबई
भरती प्रक्रियेत राबविण्यात येणाऱ्या पदाचे नाव – २) उच्चस्तर लिपिक
संबंधित अधिकारी – वित्तीय सल्लागार व उपसचिव
सादर भरती प्रक्रिया राबविण्याच्या अनुषन्गाने शासनाच्या वतीने आय . बी. पी एस. कंपनीसोबत सामंजस्य करारनामा करण्यासाठी उप आयुक्त पुरवठा , कोकण विभाग नवी मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत आहे .